लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->


नेहमी तिचाच विचार, नेहमी तिचीच आठवण
का एका मैत्रिणी साठी मी इतके झुरतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

चार चौघात मित्र मला तिच्या नावाने चिडवतात ...
का त्याचा प्रयत्न फसतो कारण खरतर मनात मी हसतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

'परदेशी चाललास पण मला विसरु नको'
का तो तिचा शेवटचा SMS मी परत परत वाचतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

तू परत कधी येणार? ती रोज रोज विचारते
का 'नक्की नाही' म्हणताना माझा आवाज खालावतो...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

तिला एक स्थळ आले, कोणी तिला पाहून गेला
का तिने त्याचे नाव घेता मी विषय बदलतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

हे प्रेम नाही मैत्रीच आहे, एकच उत्तर नेहमी
पण का ते खरे की खोटे असा प्रश्न मला पडतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
नाही हेच उत्तर मिळते मनातून...

संदर्भ:Facebook share
लेखक :anonymous


वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita