४/१८/२०१५

ती...पावसाच्या सरीत
आज मनसोक्त न्हालो होतो
ती समोर दिसताच
स्वतःशीच भ्यालो होतो

चिंब भिजलेल्या अवस्थेत
ती समोर उभी होती
नाही म्हटलं तरी
नजर दूर हटत नव्हती

चेह-यावरून वाहणार पाणी
रूप तीचं खुलवत होत
वातावरणातील धुंदीमुळे
कुणीच काही बोलत नव्हतं

तीची ती अदा
खरंच मनाला भावली होती
नजर मात्र तीच्यावरून
दूर हटत नव्हतीसंदर्भ: facebook share
लेखक :प्रविण रघुनाथ काळे

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search