एक काळ होता पावसाचा,
हा निसर्ग रम्यमय व्हायचा...
अन् त्या चिबं श्रावण सरीत,
देह आमुचे भिजून जायचा...
त्या धुदं श्रावण सरीत,
पक्षी पाखरे बागडू लागायचे...
अन् हिरवी शाल पाघंरुन,
आम्ही दरीत शोभून दिसायचो...
एकेकाळी अचानक माझ्या मला,
ती वाहत वाहत येवूनी भेटली...
अन् तिच्या पाणेरी डोळ्यात,
पाहताच क्षणी मनात आग पेटली....
आता आमचं रोजचं चालायचं,
ती मला रोज येवून भेटायची...
अन् तिच्या लाटाना उसळून ,
अंगावर जोराने शिडकावयाची..
पण नियतीला हा खेळ मंजुर नव्हता,
तिच्या ओहोटीचा माझ्यावर कोप झाला...
अन बघता बघता काय झालं की,
आमच्या वाटा दुभागत गेल्या...
पण आता ती खुप बदलली,
पहिल्या सारखं नाही बोलायची...
आता माझ्या समोरुन वाहायची पण,
दुसर् या पर्वताला जाऊन भेटायची...
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous