४/२३/२०१५

'मायक्रोमॅक्स'चा बजेट स्मार्टफोन 'कॅनव्हॉस स्पार्क' लॉन्चभारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी 'मायक्रोमॅक्स'चा आपला एक दमदार आणि शानदार स्मार्टफोन बाजारातल्या स्पर्धेत सामील झालाय.


थ्रीजी सपोर्ट असलेल्या या फोनचं नाव आहे 'कॅनव्हॉस स्पार्क' लॉन्च केलाय. मायक्रोमॅक्सच्या या बजेट स्मार्टफोनचं फ्लॅश सेल ऑनलाईन रिटेलर स्नॅपडीलवर होणार आहे. या फोनचा पहिला सेल २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

'मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस स्पार्क'ची वैशिष्ट्ये...

डिस्प्ले : ४.७ इंच हायडेफिनेशन (५४० X ९६० पिक्सल रिझॉल्युशन)

स्क्रिन प्रोटेक्शन : गोरिला ग्लास ३

प्रोसेसर : १.३ गिगाहर्टझ, क्वॉर्ड कोर मीडिया टेक्शन

रॅम : १ जीबी

रिअर कॅमेरा : ८ मेगापिक्सल, एलईडी फ्लॅशसहीत

फ्रंट कॅमेरा : २ मेगापिक्सल

इंटरनल मेमरी : ८ जीबी (३२ जीबी एक्स्पान्डेबल)

इतर फिचर्स : जीपीएस ब्लूटूथ, ऑडिओ जॅक

सोबंतच, मायक्रोमॅक्सनं टेलिकॉम कंपनी व्होडाफोनसोबत टाय-अप केलाय. ज्यामुळे, हा फोन खरेदी करणाऱ्यांना व्होडाफोनकडून ५०० एमबी डेटा दोन महिन्यांपर्यंत मोफत दिला जाईल.

हा फोन सध्या पांढरा-गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत आहे केवळ ४,९९९ रुपये

मायक्रोमॅक्सचा हा स्मार्टफोन बजेट कॅटेगिरीमध्ये श्याओमी, लेनेवो आणि मोटोरोला यांसाख्या परदेशी बनवाटीच्या स्मार्टफोन्सलाही चांगलीच टक्कर देणार असं दिसतंय.

संदर्भ: ZeeNews
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search