४/१५/२०१५

कडधान्यं खा! आरोग्य कमवा!कडधान्यं ही पोषक तत्त्वयुक्त असतात. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. आरोग्यासाठी कडधान्यं खूप उपयुक्त असतात. एवढंच नव्हे तर मोड आलेली कडधान्यं अनेक आजारांपासून आपला बचाव करतात.

कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी6 असतात. सोबतच लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमही खूप प्रमाणात असतात. यात फायबर, फॉलेट आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड सुद्धा उपलब्ध असतं. हे पोषक तत्त्वं मोड आलेले धान्य आणि कडधान्यांमध्ये मिळतात.

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. यात 35 टक्के प्रोटीन असतात म्हणून ज्यांच्या शरिरात प्रोटीन्सची कमतरता आहे, त्यांना कडधान्यं खाणं आवश्यक आहे. कडधान्यांमध्ये एंझाईम सुद्धा असतात, जे शरिरात फिटनेस वाढवतो आणि आरोग्यपूर्ण बनवतात. कच्ची मोड आलेली कडधान्यं शिजवलेल्या कडधान्या पेक्षा चांगले असतात, कारण कडधान्यं शिजवल्यानं त्यातील एंझाईम काही प्रमाणात नष्ट होतात.

कडधान्यं खाल्यानंतर ते लवकर पचतात, कारण त्यात एंझाईम असतात. ज्या व्यक्तींना पचनक्रियेचा त्रास आहे, त्यांनी तर कडधान्य खाणं फारच उपयुक्त आहे. कडधान्य केवळ आरोग्यकारकच नाही तर स्वादिष्टही असतात. आपण कडधान्यं सलाद, ब्राउन ब्रेड सोबत स्प्राउट सँडविच, कोशिंबीर इत्यादी आपण बनवू शकतो.संदर्भ:Zee news
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search