४/१०/२०१५

ओप्पोचा 206 डिग्री कॅमेराचा फोन भारतात लॉंचचीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने आजवरचा सर्वात उत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन Oppo N3 भारतात लॉन्च केला आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे हा स्मार्टफोन देशातील सर्व मोठ्या स्टोर्समध्ये उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची किंमत ४२,९९० रुपये आहे.

या स्मार्टफोनला मागील वर्षी डिसेंबरमध्ये जगात इतर ठिकाणी लॉंन्च करण्यात आलं होतं. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे, जो 206 डिग्रीपर्यंत फिरू शकतो.

तसेच या स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. याद्वारे तुम्ही क्लिक केलेले फोटो फिंगर प्रिंटच्या साहाय्याने सेव्ह करू शकता.

Oppo N3 ची खास वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच 1080x1920 पिक्सलचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे

हा स्मार्टफोन अॅंन्ड्रॉइड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करतो. हा कंपनीच्या स्वत:च्या ऑपरेटिंग सिस्टम कलर 2.0.1लासुध्दा सपोर्ट करतो.

यामध्ये 2.5GHzचा क्वॉडकोर स्नॅपड्रॅगन 801 (MSM8974AA) प्रोसेसर देण्यात आला आहे.

Oppo N3मध्ये 2GB की रॅम देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 32GB इंटरनल मेमरी आहे. ज्याला एसडी कार्डच्या मदतीने 128GB पर्यंत वाढवलं जाऊ शकते.

या स्मार्टफोनमध्ये 3000mAhची बॅटरी देण्यात आली आहे. ओप्पोचा विश्वास आहे की 30 मिनिटात हा स्मार्टफोन 75 टक्के चार्ज होतो.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search