४/१६/२०१५

याचा कोठे तरी विचार करा ...पाण्याचा एक थेँब जर 

तव्यावर पडला तर त्याचे 

अस्तित्व संपून जाते।
तोच थेँब जर कमळाच्या 
पानावर पडला तर तो 
मोत्या- सारखा चमकतो।
आणि तो जर 
शिंपल्यात पडला तर 
तो मोतीच होतो।
थेँब एकच, फरक फक्त...
॥ सहवासाचा ॥
आयुष्य जगण्यासाठी नुसते 
विचार असुन चालत नाही;
सुविचार असावे लागतात.
आपण कसे दिसतो यापेक्षा 
कसे असतो याला अधिक
महत्त्व आहे.
.
गरूडाइतके उडता येत नाही 
म्हणून चिमणी कधी उडण्याचे 
सोडत नाही.
अहंकार विरहीत लहान 
सेवाही मोठीच असते.
तुम्हाला जर मित्र हवे असतील 
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे
मित्र बना .
चांगले काम करायचे मनात 
आले की ते लगेच करून टाका.
केवड्याला फळ येत नाही पण 
त्याच्या सुगंधाने तो अवघ्या 
जगाला मोहवून टाकतो.
तुम्ही कायम सदैव खुश राहा 
आणि आनंदात जगा....!
1. जीवनाचा अर्थ विचारायचा 
असेल तर तो आकाशाला 
आणि समुद्राला विचारा.
2. बचत म्हणजे काय आणि 
ती कशी करावी हे
मधमाश्यांकडून शिकावं.
3. गुलाबाला काटे असतात 
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा 
काट्यांना गुलाब असतो 
असे म्हणत हसणे उतम !
4. वेदनेतूनच महाकाव्य 
निर्माण होते.
5. भुतकाळ आपल्याला 
आठवणींचा आनंद देतो; 
भविष्यकाळ आपल्याला 
स्वप्नांचा आनंद देतो पण 
आयुष्याचा आनंद फ़क्त
वर्तमानकाळच देतो.
6. मृत्यूला सांगाव, ये ! 
कुठल्याही रुपाने ये..
पण जगण्यासारखं काहीतरी 
जोपर्यंत माझ्याकडे आहे 
तोपर्यंत तुला या दाराबाहेर
थांबावं लागेल.
7. मोती बनून शिंपल्यात 
राहण्यापेक्षा दवबिंदू
होऊन चातकाची तहान 
भागविणे जास्त श्रेष्ठ.
8. ज्याच्या जवळ सुंदर 
विचार असतात. ,
तो कधीही एकटा नसतो.
9. जखम करणारा विसरतो 
पण जखम ज्याला झाली 
तो विसरत नाही.
10. आपण पक्षाप्रमाणे 
आकाशात उडायला शिकलो, 
माशाप्रमाणे समुद्रात पोहायला 
शिकलो पण जमिनीवर 
माणसासारखे वागायला 
शिकलो का ??


संदर्भ: Facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search