४/०२/२०१५

काय सांगतो तुमच्या शरीरावरचा प्रत्येक तीळ...

काय सांगतो तुमच्या शरीरावरचा प्रत्येक तीळ...तुमच्या शरीराच्या विविध भागांवर असलेले तिळंही तुमच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये कथन करतातच सोबत तुम्हाला शुभ-अशुभाचे संकेतदेखील मिळतात....


काळ्या रंगाचा तीळ गालावर किंवा ओठांवर असेल तर तर क्या बात है... तुमच्या सुंदरतेला चार चाँद लावण्यासाठी हा एकच तीळ पुरेसा ठरतो. या तिळांमुळेही व्यक्तीच्या सुंदरतेत आणि आकर्षणात भर पडते. पण हाच तीळ ओठांच्या खालच्या बाजुला असेल तर मात्र दरिद्र्याची सूचना देतो.
जाणून घेऊयात... शरीरावर कोणत्या भागावर असणारा तीळ काय सांगतो...


- कपाळाच्या उजव्या भागावर असणारा तीळ समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असतो.


- कपाळाच्या मध्यभागी दिसणारा तीळ व्यक्तीच्या भक्कम आर्थिक परिस्थिती व्यक्त करतो.


- दोन भुवयांच्या मध्ये असलेला तीळ व्यक्ती परोपकारी, उदार आणि दिर्घायुषी असल्याचं सांगतो.


- गालांवर असलेला तीळ आर्थिक दृष्टी भरभक्कम पण व्यक्ती दुर्व्यसनी असल्याचं सूचित करतो.


- नाकाच्या उजव्या भागावर असलेला तीळ सुख आणि धनाकडे तर नाकाच्या डाव्या बाजुला असला तीळ कठिण परिश्रण आणि सफलतेकडे निर्देश करतो


- नाकाच्या मध्यावरच तीळ असेल तर व्यक्ती स्थिर वृत्तीची नसून इकडे तिकडे भटकताना दिसते.


- उजव्या गालावर असलेला तीळ प्रगतीशील असल्याचं सांगतो.


- डाव्या गालावर असलेला तीळ अशुभ मानला जातो. असा तीळ गृहस्थ जीवनात धनाची कमतरता सांगतो.


- हनुवटीवर आढळणारा तीळ व्यक्ती स्वार्थी, व्यक्तिवादी, केवळ स्वत:च हित पाहणारा आणि समाजापासून लांबच असलेला असा दिसतो.


- कंठावर तीळ असेल तर ती व्यक्ती बुद्धिजीवी, सफल आणि स्वावलंबी असलेली आढळते.


- डाव्या हातावर असलेला तीळ शुभ चिन्हं व्यक्त करतो तर उजव्या हातावर तीळ कर्जाची चिन्हं दाखवून देतो.


- पोटाच्या खालच्या भागावर तीळ असेल तर अशी व्यक्ती कामूक असते. अनेक स्त्री पुरुषांच्या शरीरावर अशा प्रकारचे तीळ आढळून येतात


संदर्भ: zee news
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search