व्हॉट्स अॅपनं अखेर आपलं व्हॉइस कॉल हे फीचर आजपासून सगळ्या युजर्ससाठी सुरु केलं आहे. व्हॉटस अॅपचं अपडेट केल्यास तुम्हांला हे नवं फिचर पाहता येणार आहे. सुरुवातील व्हॉटस अॅपने आपलं हे फीचर मर्यादित स्वरुपात ठेवलं होतं. मात्र आजपासून सर्वच युजर्सना व्हॉइस कॉल फीचर वापरता येणार आहे.
हे फिचर आणून व्हॉटस अॅपने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे आता अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सना या फीचरचा वापर करता येणार आहे.
अद्यापपर्यंत व्हॉटसअॅप कॉलिंग फीचर हे फक्त मर्यादित स्वरुपात होते. या फिचरची गेल्या अनेक दिवसापासून चाचणी सुरु होती. गेल्या अनेक दिवसांपासून या फिचरविषयी चर्चा सुरु होती. मात्र, सुरवातील यात अनेक अडचणी आल्या. अखेर आजपासून हे फिचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
संदर्भ: ABP news
लेखक :anonymous