५/२३/२०१५

फणस का खावे


जॅकफ्रुट असे इंग्रजी नाव असलेले फणस हे वट कुलात मोडणारी वनस्पती आहे. फणस दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. ओरोग्याच्या दृष्टीने फणसाला अत्यंत महत्त्व आहे. भारतामध्ये काही भागांमध्ये कच्च्या फणसाची भाजी देखील केली जाचे. प्रामुख्याने कठोर अशा सालीखालील पिकलेल्या फणसांचे गर काढून खाणे पसंत केले जाते.
फणसापासून मिळणारी पोषणा संबंधी माहिती आणि समज
*एक कप कच्च्या फणसाच्या रसात साधारण १५५ कॅलरीज आढळत असल्याचे अभ्यासकांनी नोंदवले आहे.
*फणसामध्ये सोडिअमचे प्रमाण कमी असून, कोलेस्ट्रॉल आणि चरबीवर नियंत्रण मिळते.
*आरोग्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्त्व ए, सी, रायबोफ्लेव्हिन, निअँसिन, थायमिन आणि फोलेट हे घटक फणसात आहेत.
*फणसामध्ये आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॉपर, झिंक आणि सेलेनियम ही खनिजे आहेत.
*फणस हा फायबरचा मोठा स्त्रोत असून ११ टक्क्यांपर्यंत फायबर फणसापासून मिळते.
*फणसामध्ये कोणत्याही प्रकारची साखर नसल्यामुळे मधुमेह झालेल्यांसाठी महत्त्वाचे फळ.
*फणसातील पोषणद्रव्यांमध्ये कर्करोग विरोधी, क्षरण विरोधी आणि अल्सर विरोधी घटक असल्यामुळे अनेक रोगांवर गुणकारी.
म्हणजेच रसाळ गर असलेले फणस आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेसंदर्भ: लोकसत्ता 
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search