५/२०/२०१५

'मेजू'चा M1 Noteभारतामधील चीनी स्मार्टफोन कंपनीच्या यादीमध्ये आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. शाओमी, वनप्लस, ओप्पो, वीवो यांच्यानंतर चीनी स्मार्टफोन कंपनी ‘मेजू’देखील भारतीय बाजारपेठेत उतरली आहे.‘मेजू’च्या फेसबुक पेजवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘मेजू’चा Meizu M1 Note हा भारतात पहिला स्मार्टफोन लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या फेसबुक पेजवर एक फोटो पोस्ट केला असून त्यावर "Are you OK? 5.18 see! see!" J. Wong असं लिहलं आहे. या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जे. वॉन्ग हे आहेत.या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अजूनही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. हा स्मार्टफोन शाओमीला टक्कर देईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर या स्मार्टफोनची किंमत 13,800 रु. असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच या स्मार्टफोनला अॅपलसारखा लूक देण्यात आला आहे.Meizu M1 Note स्मार्टफोनचे फिचर्स:5.5 इंच डिस्प्ले, 1080x1920 पिक्सल रेझ्युलेशनप्रोसेसर 1.7GHz , ऑक्टाकोर मीडियाटेक 64 बिटअँड्रॉईड 4.0 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम2GB रॅम, 8GB आणि 16GB मेमेरी एसडी कार्डच्या साह्याने आणखी मेमरी वाढविता येऊ शकते.M1 Note मध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा3140mAh बॅटरी क्षमता


संदर्भ: ABP News
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search