तैवानमधील आघाडीची गॅझेट कंपनी आसूसने झेनबुक UX305 लाँच केला आहे. हा जगातला सर्वात स्लीम लॅपटॉप असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आसूसच्या या लॅपटॉपचा डिस्प्ले 13.3 इंच असून फक्त 12.3 मिमी जाड आहे.
आसूसच्या झेनबुक UX305 ची किंमत 49 हजार 999 रुपये आहे. 15 मे पासून तो विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. जोडीने आसूसच्या एक्स्क्लुझिव्ह स्टोअर्समध्येही झेनबुक UX305 विक्रीसाठी उपलब्ध असेल.
आसूस झेनबुक UX305 ची वैशिष्ट्यं :
वजन- 1.2 किलोग्रॅम
डिस्प्ले- 3200x1800 रेझोल्युशन असलेली 13.3 इंचाची qHD स्क्रीन
डिझाईन- झेनबुक UX305 चं डिझाईन अत्यंत आकर्षक आहे. ऑब्सीडिअन स्टोन आणि सिरॅमिक अलॉय अशा दोन रंगांमध्ये तो उपलब्ध असेल.
रॅम- 8 जीबी.
हार्डडिस्क- 512 जीबी
प्रोसेसर- इंटेल कोअर M-5Y10
बॅटरी बॅकअप- 10 तास
संदर्भ: ABP news
लेखक :anonymous