महाराष्ट्रातील साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजप्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन व आरोग्य सेवा या क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या मान्यवराचा यथोचित सन्मान करण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या रूपाने एका अस्सल शिवभक्ताचा गौरव झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
‘शिवकाळ’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या दोन शब्दांसाठी मी माझे आयुष्य वेचले. हे अलौकिक व्यक्तित्व जनतेपुढे नेण्याचे जे आयुष्यभर कार्य केले, त्याची दखल या पुरस्कारामुळे घेतली असे वाटते. मी धन्य झालो. या पुरस्काराने मी महाराष्ट्राशी, इथल्या मातीशी वेगळय़ा अर्थाने जोडला गेलो आहे.
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
संदर्भ: लोकसत्ता