५/१०/२०१५

केळे आरोग्यवर्धक...खा आणि तंदुरुस्त राहा


वर्षाच्या १२ महिने नेहमी केळे सर्वत्र उपलब्ध असते. हेच केळे आरोग्यवर्धक आहे. त्याचे अनेक फायदेही आहेत. केळ्यामध्ये औषधी गुण आहेत.
केळे हे औषधी आहे. दहा हजार सालापासून माणसाच्या जीवनात केळ्याला महत्व आहे. जगातील अनेक देशांमध्ये केळ्याची शेती केली जाते. केळ्याचे सेवन सर्वाधिक लोक करीत आहेत. केळे हे ताकत वाढविणारे फळ म्हणून त्याकडे पाहिले जाते.
केळे हे औषधी आहे हे अनेक लोकांना माहीत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला केळ्याचे अनेक फायदे सांगणार आहोत. केळे खा आणि तंदुरुस्त राहा, हेच सांगणे आहे.

- केळ्यात कार्बोहाइड्रेटची अधिक मात्रा असते. केळे हे रक्त वृद्धी आणि शरीरात ताकत वाढविण्यास मदत करते. 
​- केळ्यात लोह मात्रा (मॅग्नीशियम) जास्त असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांचा केळे लाभदायक ठरते. शरीरातील रक्त वाहिण्यांमध्ये रक्त गोठविण्यापासून रोखण्यास ते मदत करते. 
- केळे लहान मुलांसाठी चांगले आणि पौष्टीक असते. उत्साह वाढविणारे आणि थकवा घालवणारे आहे. कफ झालेल्या रुग्णांसाठी केळे चांगले असते. 
- गरोदर महिलांसाठी केळे चांगले आहे. कारण त्यात व्हिटॅमिन जास्त असते. 
- केळ्याचा सफेत भागाचा रस काढून त्याचे नियमित सेवन केल्यास डायबेटीसचा आजार हळू हळू कमी होत बंद होतो.
- जेवण घेतल्यानंतर केळे खल्ल्यानंतर जेवण पचण्यास मदत होते.

- कच्चे केळे दुधात मिसळून ते त्वचेला लावल्यास उजळपणा येतो. तसेच चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याला चमक येते.
- ज्यांना अल्सरचा त्रास असेल किंवा पोटाबाबत समस्या असतील त्यांनी केळे खाल्ले पाहिजेत. 
- केळ्याचे सेवन दुधाबरोबर केले तर काही दिवसात आरोग्यात चांगली सुधारणा होण्यास मदत होते. 
- रोज सकाळी एक केळ आणि एक ग्लास दुध घेतले तर तुमचे वचन नियंत्रणात राहते. तसेच सारखी सारखी भूख लागत नाही.
- तुम्हाळा मळमळत असेल तर एका वाटीत केळे फेटायचे. त्यात एक चमच्या साखर, एक वेलची किसून किंवा पावडर करून मिसळून ते खायचे. त्याने आराम मिळतो.


संदर्भ:Zee News
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search