वाढत्या वयानुसार जर आपण आपली झोप पूर्ण केली नाही, तर सावधान व्हा... आपल्या मेंदूच्या कमी होणारा व्हॉल्यूमचा संबंध आपल्या झोपेशी होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे पुढं आलंय.


अभ्यासकांच्या मते कमी झोपेचा संबंध आपल्या डोक्याच्या विविध भागांसोबत जसा अग्रभाग (फ्रंटल), वेळ (टेंपोरल) सारख्या भागांच्या व्हॉल्यूममध्ये कमी-जास्त सोबत असतो. 60 वर्षांहून अधिक वय असलेल्यांनी ही बाब अधिक जपावी.


ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड विश्वविद्यालायातील अध्ययन लेखन क्लेयर सेक्सटननं सांगितलं की, हे माहित नाहीय की कमी झोपेचा संबंध मेंदूच्या रचनेमध्ये बदल झाल्यानं होतो. हा अभ्यास 20-84 वयोगटातील 147 लोकांवर केला गेला. संशोधकांनी कमी झोप आणि डोक्याचं व्हॉल्यूम या दोघांमधील संबंधाचा अभ्यास केला.


सेक्सटननं सांगितलं की, भविष्यात होणाऱ्या संशोधनामध्ये अभ्यासाची गरज आहे की, झोपेत सुधारणा झाली तर मेंदूच्या व्हॉल्यूममधील कमी हळू होते. हा अभ्यास प्रबंध ‘न्यूरोलॉजी’मध्ये प्रकाशित झालाय.

संदर्भ: Zee news
लेखक :anonymous

Blogger द्वारा समर्थित.