५/२३/२०१५

फिल्म रिव्ह्यू अगं बाई अरेच्चा २केदार शिंदे दिगदर्शित 'अगं बाई अरेच्च्या' हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच... मराठी इंडस्ट्रीतला 'फॅटन्सी'वर आधारलेला वेगळ्या धाटणीतला सिनेमा म्हणून याकडे पाहिलं जातंय... आणि आता याच सिनेमाचा सिक्वेल 'अगं बाइ अरेच्च्या २' आपल्या भेटीला आलाय. 'अगं बाइ अरेच्च्या - २' या सिनेमाचा आणि या सिनेमाचा खरंतर कुठेही काहीही कनेक्शन नाही. ती एक कम्प्लीट वेगळी कथा होती तर ही एक अत्यंत वेगळ्या पार्श्वभूमीवरची गोष्ट आहे.


कथानक
केदार शिंदे दिग्दर्शित सोनाली कुलकर्णी स्टारर 'अगं बाई अरेच्चया - २' ही कहाणी आहे शुभांगी हेमंत कुडाळकर या मुलीची... शुभांगीच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या पुरुषांशी तिची भेट होत असते... यांच्या प्रेमातही ती पडते... अगदी तिच्या लहानवयापासून ती मोठी होइपर्यंत तिच्या जीवनात अनेक पुरुष येऊन जातात... पण कधी कुणीच तिचं होत नाही... याच्यामागेही एक कारण असतं... हे कारण असं असतं की जर शुभांगी एखाद्या पुरुषावर प्रेम करतेय आणि तो पुरुषही तिच्यावर तितकंच मनापासून प्रेम करत असेल... आणि हे घडत असताना जर तिचा स्पर्श त्या व्यक्तिला चुकुनही झाला... तर त्या व्यक्तीचा भयंकर अपघात होतो... असे अनेक जण तिच्या आयुष्यात येतात.. मग काय घडतं? शुभांगी अविवाहीत राहते की तिला तिचं खरं प्रेम अपघातत न होता मिळतं.. हा सस्पेन्स मी उलगडणार नाहीये कारण त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल..

अभिनय
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं साकारलेल्या शुभांगी कुडाळकर या व्यक्तिरेखेवर हा संपूर्ण सिनेमा बेतलेला आहे. एक अत्यंत गोड मुलगी, जी सुंदर आहे, चंचल आहे, स्वावलंबी आहे, पण तरी तिच्या आयुष्यात काहीतरी मिसिंग असतं. सोनालीनं ही भूमिका साकारताना या बारीक सारीक गोष्टीचा खूप व्यवस्थित विचार केल्याचं तिच्या अभिनयातून जाणवतं. तिचा अभिनय उत्तम झालाय यात काहीच शंका नाही पण काही ठिकाणी सोनाली थोडीशी लाऊडही वाटते.

अभिनेता धरम गोहीलचा हा पदार्पणाचा सिनेमा... या सिनेमातला त्याचा अभिनय खूप छान झालाय. खरं तर या रोलसाठी तो एकदम योग्य वाटतो. त्यानं त्याची भूमिका योग्य पद्धतीनं निभावलीय.

यातबरोबर भरत जाधवनं साकारलेली व्यक्तिरेखा खूप मजेशीर झलीय. प्रसाद ओकनं साकारलेला प्रल्हाद किसमिसेही 'फुल्ल टू एंटरटेनिंग' झालाय.

संगीत
निशाद या नवोदित संगीतकारानं या सिनेमाला संगीत दिलंय. एक पोरगी, माझा देव कुणी पाहिला, जगण्याचे भान अशी अनेक सुरेल गाणी त्यानं कंपोज केली आहेत. 'अगं बाइ अरेच्च्या-एक' प्रमाणेच या सिनेमातलं सेगीतही अप्रतीम झालंय.

दिग्दर्शन
केदार शिंदेनं या सिनेमासाठी दुहेरी भूमिका पार पाडल्यात. त्यानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंच पण त्यानं या सिनेमासाठी कथाही लिहिली आहे. सिनेमाला त्यानं एक दिगदर्शक म्हणून छान ट्रीटमेंटही दिली आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात म्हणजे इंटरवलच्या आधी सिनेमा खूपच रंजक वाटतो. भरत जाधव, प्रसाद ओकनं साकारलेल्या अशा अनेक पात्रांची एन्ट्रीही याच दरम्यान होते. त्यामुळे सिनेमा प्रेक्षकांना यशस्वीरीत्या धरून ठेवतो.

तर दुसरीकडे इंटरवलनंतर सिनेमा थोडासा लांबलाय. सिनेची कथा, संवाद, स्क्रीनप्ले या सगळ्या गोष्टी फीट बसल्या आहेत पण कुठे तरी जर सेकेंड हाफमध्ये सिनेमाची लांबी आणखी कमी करता आली असती तर कदाचित सिनेमा आणखी एंटरटेनिंग झाला असता.


संदर्भ: Zee News
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search