५/०२/२०१५

फिल्म रिव्ह्यू : 'टाईमपास २मराठी सिने जगतातला मोस्ट अवेटींग 'टाइमपास २' हा सिनेमा प्रदर्शित झालाय... या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता दिसून येत होती.

दिग्दर्शक रवि जाधवचा टाइमपास या सिनेमाचा सिक्वल 'टाइमपास २' या विकेंडला आफल्या भेटीला आलाय. प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट स्टारर या सिनेमा म्हणजे दगडू आणि प्राजक्ता यांच्या लव्ह स्टोरीचा पुढचा भाग...
१५ वर्षांनंतर या दोघांच्या या प्रेम कहाणीचं काय होतं... त्यांच्या या नात्याला माधवराव लेले अर्थातच वैभव मांगले यांच्याकडून होकार मिळतो का... हे पहायला तुम्हाला सिनेमागृहात जावंच लागेल...

कथानक :

बरं टीपी २ या नवीन व्हर्जनमध्ये दगडू आणि प्राजक्ताच्या कहाणीची सुरुवात माधवराव लेले यांच्यापासूनच होते. मोठा दगडू आपल्या मोठ्या झालेल्या मित्रांसोबत अगदी ऐ'श की लाइफ' जगत असतो.. याच दरम्यान त्याचा भूतकाळ त्याच्या समोर येऊन उभा राहतो. त्याचा भूतकाळ म्हणजे छोटा दगडू... तो त्याला पुन्हा प्राजक्ताची आठवण करुन देतो.... त्याला पुन्हा एकदा प्राजक्ताचं वेड लागतं...

आपल्या प्रेमाच्या अर्थातच प्रजक्ताच्या शोधात दगडू थेट कोकणात पोहचतो. तिथे काय घडतं... तर तिथे त्याची भेट होते माधवराव लेले अर्थातच शाकालसोबत..

पण यंदाची दगडू आणि शाकालची भेट काही औरच ठरते... प्रजक्ताचे बाबा माधवराव लेले दगडूवर इतके इम्प्रेस होतात की ते स्वता:च त्याला प्राजक्ताशी भेटवायला मुंबइत घेऊन येतात... असं काय घडतं की लेले इतके बदलतात..???आणि मग मुंबईत आल्यानंतरचे ट्विस्ट अॅन्ड टर्नस् या सगळ्या गोष्टींची खरी गंमत सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघण्यातच आहे.

अभिनय :
'टाईमपास' या सिनेमाचा सिक्वल घोषीत झाल्या-झाल्याच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे दगडूची भूमिका कोण साकारणार? प्रियदर्शन याचं नाव घोषीत होतात अनेक चर्चांना सुरुवात झाली होती... 'टाईमपास २' या सिनेमात अभिनेता प्रियदर्शन जाधव यानं साकारलेला दगडू ठिकठाक झालाय. तो त्याच्या ओव्हरऑल प्रेझेंटेशनमुळे दगडू वाटतो यात काडीमात्र शंका नाही, पण त्याचं परिणाम हवा तसा झालेला दिसत नाहीय.

खरंतर यात स्क्रिनप्लेचा जास्त दोष जाणवतो. टाइमपास या सिनेमात ज्या ताकदीचं प्लानिंग, प्लोटींग आणि स्क्रिनप्ले होतं ते या सिनेमात आपल्याला मिसींग वाटतं... याचबरोबर टाइमपास या सिनेमात दगडू बरोबरच त्याच्या साथीदारांचीही धमाल अनुभवायला मिळाली होती, जी पुन्हा यात जाणवात नाही. मलेरियाची भूमिका साकारली आहे अभिनेता संदीप पाठक यांनी... खरंतर त्याचा हवा तितका हवा तसा वापर करण्यात आला नाहीय. एव्हढच नाही तर प्रिया आणि प्रियदर्शन जाधव या दोघांची कॅमिस्ट्रीही प्रथमेश आणि केतकी यांच्या तुलनेत फ्रेश आणि इंटरेस्टिंग वाटत नाही.

प्रिया बापटनं साकारलेली प्राजक्ता छान झालीय... खरंतर प्रिया या कॅरेक्टरच्या खुपच प्रेमात दिसली आणि म्हणून कदाचित ते फुलवण्यात य़शस्वी झाली असावी.

या सिनेमात जो खऱ्या अर्थानं बाजी मारुन जातो तो म्हणजे अभिनेता वैभव मांगले... म्हातारपणाचा माधवराव लेले त्यानं खरंच उत्तम पार पाडलाय.

दिगदर्शन :
रवि जाधवनं टाइमपास २ या सिनेमाची हाताळणी करताना उगाचाच कीहीतरी प्रयोग केलेले नाहीय. त्यांनं टाइमपास प्रमाणेच 'टाइमपास २' साठीही साधं आणि सिंपल कथानक निवडलंय... पण कुठेतरी सिनेमाचा स्क्रिनप्ले भरकटलेला वाटतो... त्यानं सिनेमाला योग्य ट्रीटमेंट जरी दिली असली तरी सिनेमाचा फ्लो मिसींग वाटतो... तो तुम्हाला बांधून ठेवण्यात यशस्वी होत नाही... अनेक कट्स आणि जर्क्स सिनेमा पाहताना जाणवतात.

खरंतर ज्या पद्धतीचे संवाद आणि ओव्हरऑल पॅकेजिंग टाइमपासमध्ये अनुभवता येतं, ते या सिनेमात मिसींग वाटतात... पण सिनेमा एन्टरटेनिंग आहे... भाऊ कदम, वैभव मांगले यांचा अभिनय पैसा वसूल आहे..


संदर्भ: Zee news
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search