५/१०/२०१५

'मायक्रोसॉफ्ट एज' घेणार 'इंटरनेट एक्सप्लोरर'ची जागामायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे 'मायक्रोसॉफ्ट एज' या नव्या वेब ब्राऊझरचे अनावरण करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टच्या 'विंडोज-१०' या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये 'इंटरनेट एक्सप्लोरर' या वेब ब्राऊसरची जागा आता 'मायक्रोसॉफ्ट एज' घेणार आहे.

सुरूवातीला 'स्पार्टन' या नावाने तयार करण्यात आलेला हा नवीन वेब ब्राऊसर आता 'एज' या नावाने ओळखला जाईल. मायक्रोसॉफ्टच्या एका कार्यक्रमात यासंबंधीची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थितांना या ब्राऊझरच्या काही खास वैशिष्ट्यांची झलकही पहायला मिळाली. 'मायक्रोसॉफ्ट एज' या ब्राऊझरची रचना आजच्या पिढीला समोर ठेवून करण्यात आली आहे. यामध्ये वापरकर्त्याला त्याच्या सवयीनुसार बातम्या, शेअर बाजाराचे निर्देशांक, हवामान आणि अन्य गोष्टींची माहिती शोधता येणार आहे.
या ब्राऊझरच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल नेमकी माहिती कळू शकली नसली तरी, 'विंडोज-१० या नव्या ऑपरेटिंग प्रणालीला केंद्रस्थानी ठेवून 'मायक्रोसॉफ्ट एज' ब्राऊझर बनविण्यात आला आहे. या ब्राऊझरच्या सहाय्याने वापरकर्त्याला आता सोशल साईटसवर असताना थेटपणे एखाद्या वेबपेजवर जाता येणार आहे. त्यामुळे माहिती वाचण्यातील अडथळे कमी होणार आहेत. 'मायक्रोसॉफ्ट एज' हा ब्राऊझर डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेट आणि मोबाइल अशा सर्व प्रकारच्या उपकरणांवर वापरता येईल.

संदर्भ: Loksatta
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search