५/३१/२०१५

कान्हेरी लेण्यामुंबईच्या उपनगरात पश्चिम रेल्वेवरील बोरिवली या स्थानकापासून पूर्वेकडे अगदी नजीकच्या अंतरावर असलेल्या विस्तीर्ण कृष्णगिरी उपवनातून (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) या लेण्यांकडे जाण्याचा मार्ग आहे. या उपवनात असलेल्या डोंगर मालिकेतील कातळात ख्रिस्तपूर्व २०० वर्षे ते सहाव्या शतकापर्यंतच्या काळात या लेण्या कोरण्यात आल्या असाव्यात, असा जाणकारांचा दावा आहे. बौद्ध धर्माचा वाढता प्रभाव असताना या लेण्या खोदण्यात आल्या असून त्यातील काही कोरीव शिल्पे भव्य आणि सुंदर आहेत. या ठिकाणी १०९ बुद्धविहार असून या विहारातून साधना करणाऱ्या भिक्षूंसाठी पाण्याच्या भूमिगत टाक्या खोदण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाण्याचा व सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा म्हणून या परिसरात भूमिगत नाल्याही खोदण्यात आल्या आहेत.


लेण्यातील वास्तुशिल्प पुरातन असूनही ते अतिशय प्रशस्त आणि देखणे आहे. विशेषतः गुंफा क्रमांक १, २ व ३ तर अतिशय मनोरम आहेत. या लेण्यात कोरण्यात आलेली गौतम बुद्धाची शिल्पाकृती एक उत्कृष्ट कलाविष्कार म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. बौद्ध भिक्षूंना दैनंदिन साधना व सामूहिक प्रार्थना करता यावी यासाठी स्वतंत्र लहान-मोठी दालनं या ठिकाणी आहेत. बोरिवलीपासून या लेण्या सुमारे ८-९ कि.मी. अंतरावर आहेत.

बोरिवलीच्या पश्चिमेस रेल्वे स्थानकापासून अवघ्या दीड कि.मी. अंतरावर मंडपेश्वर लेण्या आहेत. या लेण्याही पुरातन असून सहाव्या शतकात खोदण्यात आल्या असाव्यात. या गुंफांमध्ये एक भव्य शिवालय असून दरवर्षी शिवरात्री आणि त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी उत्सव साजरा केला जतो.
नजीकचे रेल्वे स्थानक : (प.रे.), मुंबई


संदर्भ: www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:www.tripadvisor.com

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search