लोकल माणसाचा लोकल प्रवास
कधी रूटीन तर कधी खास ।।ध्रु।।
प्रत्येक लोकल ला नेहमीच गर्दी
उन पाऊस वा असो सर्दी
गाड़ी पकड़ण्यास सगळेच वक्तशिर
लोकल मात्र नेहमीच बेफ़िकीर
अख़्या मुम्बईचा एकच श्वास
लोकल माणसाचा लोकल प्रवास ।।१।।
सलाम त्या प्रत्येक मुम्बईकराला
जो नेहमी भिडल वादळाला
झेलले आम्ही सगळेच प्रहार
आमची लोकल आमच हत्यार
काय गुपित झाली मुम्बईची आरास
लोकल माणसाचा लोकल प्रवास ।।२।।
वेगळे नियम वेगळे कायदे
कोठे तोटे तर कोठे फायदे
मुम्बई ही आर्थिक राजधानी
लोकल तिची जीवन वाहिनी
अचंबित करुनी गेला जगास
लोकल माणसाचा लोकल प्रवास
कधी रूटीन तर कधी खास ।।३।।
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :आशीष अवसरे
ashishavsare@gmail.com