५/०१/२०१५

मागे वळून बघतांना


मागे वळून बघतांना , 
जीवनाचे रहस्य उलगडत जाते ,भूतकाळातील आठवणींना पाया माना . 
सत्य ते हे की ,वर्तमानात जगायचे असते . १ 
काळाच्या ओघात बरेच काही वाहून गेले , 
संधी आली पण गमावली ,असे सारखे वाटत असते , 
हूर हूर मनात दाटून येते ,भविष्याची काळजी मात्र वाढतच जाते . २ 
भूत -भविष्याचे ओझे वर्तमानच वाहत असतो . 
वर्तमानातच भविष्याचे उज्जल स्वप्न दडलेले असते , 
वर्तमानालाच आपले माना , 
आला क्षण सुखात घालवा . ३


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : अनघा कुलकर्णी

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search