चिखलात फुलते कमळ नाजूक
सुंदर ते दिसते, हसते फुलते,
लाल, गुलाबी, पांढर्या अशा कितीतरी रंगांत ते फुलवुनी जाते।
देवाच्या माथ्यावर ते खुलून दिसते,
शोभा वाढविते ते श्रीच्या देवळात,
बहुमान मिळे त्याला ईश्वरापाशी।
असे सुंदर हसरे कमळ ते सर्वांसी आवडी।।
(मनुष्याला ते शिकवी) ताणतणावाच्या, चिंतेच्या चिखलातही,
तू माझ्यासारखा फुलत राहा,
तुझे इच्छित कर्तव्य तू करत राहा,
एक दिवस मिळेल तुलाही
` बहुमान' माझ्यासारखा।।
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : अनघा कुलकर्णी