इथे कुणी नाही कोणाचे
प्रत्येकजण पैशाच्या मागे
नसे सोबती कुणी सुख दुःखाचा
कंटाळा आलाय या मानवजन्माचा
इथे प्रत्येकाचा मनात असे
टाळुवरचे लोणी
गिधाडाप्रमाणे लचके तोडुन
व्हायच पापाचे धणी
उपयोग नाही असलेल्या मेंदूचा
कंटाळा आलाय या मानवजन्माचा
रोज चाललेल्या या धावपळीचे
बैलासारखा कंपनीत राबायचे
आजच मरण उद्यावर ढकलायचा
कंटाळा आलाय या मानवजन्माचा
प्रत्येकाचा काळ असतो बारा जन्माचा
नको विचार आता पुढच्या जन्मीचा
देवा फक्त एकच जन्म दे मानसाचा
कंटाळा आलाय या मानवजन्माचा
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous