तिच्या त्या गुलाबी डोळ्यात,
एक वेगळीच धुंद नशा साठायची...
झाकताच नयन अन् माझे,
मनी माझ्या ती आठवायची...
तिच्या त्या नशिली ओठात,
गोडवा असा मधाळ असायचा...
स्पर्श करताच तिच्या ओठी,
अंतरंगात प्रेमाचा मोहर फुटायचा...
तिच्या त्या कुरळ्या केसात,
हलकासा सुगंध साठायचा...
जवळुन जाता ती माझ्या,
आसपास असलेली भासायचा...
तिच्या त्या पापण्याच्या अदा,
पाहताना मन गुंतायचा...
काय माहित मी पुन्हा,
स्वताःला त्यात गुंतायचा...
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous