काही वर्षापूर्वी ऐकलेल्या एका प्रहसनाचे नाव अजूनही मनाच्या सन्दि कोपऱ्यातून बाहेर पडतच नाही ,अजूनही घट्ट दडी मारून बसले आहे .कदाचित त्या अनामिक लेखकाची आणि माझ्या दुक्खचि सल एकच असावी.
माझा जन्म शिवाजी पार्क दादरचा आणि माझे शालेय शिक्षण माझ्या आजोळी "दादांच्या बालमोहन विद्यामंदिर मध्ये झाले.आमच्या शाळेचा उल्लेख दादांची बालमोहन असाच होत होता आमचे दादा आणि आमची शाळा हि एकमेकांची अविभाज अंगे होती शाळेचा उल्लेख "दादांची बालमोहन असाच होत असे ,आजही शाळेचे नाव सांगताना "दादांची बाल मोहन विद्यामंदिर"असेच शब्द उमटतात ,गुरूंच्या नावांचे इतके ठसठशीत मळवट भरलेले गुरुकुल आम्हाला लाभले हे आमचे सदभाग्य ,त्यांचे प्रेम आणि आपुलकी आठवली कि अजूनही मन गहिवरते.खरोखर तसे प्रेम करणे आजच्या कुठल्याही "ज्ञान महार्षीला जमाने नाही हेच खरे.त्याकाळी शिवाजी पार्कला ग्यास्चे दिवे होते हातात सहा पुरुष लांबीची काठी घेतलेला महापालेचा एक कर्मचारी संध्याकाळ झाली कि एकेक करत दिवे पेटवत जायचा ,त्या दिव्यांच्या मंद प्रकाशात आसमंत उजळून जायचा , दादांच्या आठवणीने आजही मनाचा कोपन्कोपरा उजळतो ,आजोळी आजी आजोबांच्या आणि मामा मावश्यांच्या अनुभवलेल्या प्रेमाची चव अजूनही अवीट वाटते.
माझे बालपण जसे दादरला गेले तसेच दर शनिवारी संध्याकाळ ते सोमवार सकाळ माझ्या आई वडलांच्या घरी विले पार्ल्याला जात असे.शिवाजी पार्क आणि विले पार्ल्यातल्या नरिमन रोड वरच्या रांगणेकर वाडीतही जात होता ,,दुहेरी निष्ठेला तेव्हा कुठलाही अटकाव नव्हता.
बालपणातले दिवस सुखाने जात होते ,धावपळ ,घाई हे शब्द जणू आमच्या साठी नव्हतेच ,खेळणे ,खाणे आणि हुंदडणे ह्या शिवाय आम्हाला काहीही माहित नसायछोटी छोटी कौलारू घरे हे पार्ल्याचे वैय्शिष्ट होते .बहुतेक सर्व घरे एक मालकांची आणि त्यांच्या बरोबर राहणाऱ्या एकाथावा दोन भादेकारुणा गुण्या गोविन्द्याने सांभाळून राहत असत.काही काही चाली वजा वाड्यात मालक आणि चारपाच भाडेकरू राहत असत.घराच्या भिंती केवळ मोठ्यांसाठी असत मुलांना त्या दिसतही नसत.
पार्ले टिळक विद्यालय,टिळक मंदिर ,पार्लेश्वाराचे मंदिर , गोखल्यांचे राममंदिर,शान्भागांचे मद्रासी राम मंदिर,कुंकू वाडीतले हनुमान मंदिर,हि हि पार्ले करांची आद्य श्रद्धास्थाने.
पार्लेश्वर हे पार्ल्याचे प्रमुख देवस्थान आणि श्रद्धास्थान ,कमीतकमी एकदातरी पार्लेश्वाराला हात जोडल्याशिवाय पर्लेकारांचा दिवस जात नसे ,लेले गुरुजी हे तेथील प्रमुख गुरुजी ,पर्लेश्वारावर श्रद्धा नसलेला पार्लेकर विरळाच .रार्ह्त्रीय सेवा संघाचे शाखा पर्लेश्वराच्या लगतच्या इमारतीत चालत असे.
प्रत्येक देवस्थानाचे ठराविक उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात ,गोखल्यांच्या राम मंदिरात ,रामनवमीला सुंठवडा मिळत असे,मद्रासी राम मंदिरात चैत्री नवरात्रीला भोजन प्रसादाचा लाभ समस्त पार्लेकर घेत असत,त्या नंतर संपन्न होणारी रथयात्रा फारच देखणी असे.बहुतेक प्रत्येक घरातून नारळ वाहिला जात असे,प्रामुक्ख्याने ह्या रथयात्रेचे नेतृत्व शानभाग घराण्याकडे असे ,प्रसाद म्हणून परत दिलेल्या अर्ध्या नारळात लावलेल्या गंधाचा प्रासादिक आणि पवित्र सुवास अजूनही माझ्या मनात दरवळतो आहे ,मोठाल्या भांड्यात बनवलेले मिरी,गुळ आणि वेलची मिश्रित पेय "पानक"ह्या नावाने दिले जात असे.ह्या घराण्यातील एक पुरुष डोक्यावर रामाची मूर्ती घेऊन मंगलोरहून पार्ल्यात आले आणि त्यांनी ह्या राम मंदिराची स्थापना केली.त्यांना कवडीवाले बुवा ह्या नावाने समस्त पार्लेकर ओळखत,आणि त्यांच्या मंदिराला मद्रासी राम ह्या नावाने ओळखले ओळखले जायचे.
गोखल्यांचा राम मात्र पूर्णतः मराठी होता. खरे गुरुजी हे गोखले राममंदिराचे पुजारी होते.
सुभाष रोड वर खोसला घराण्याची एक खोसला निवास नावाची सुंदर इमारत आहे तिच्या अग्रभागी एक श्री कृष्णाची एक देखणी मूर्ती आहे ,दर गोकुळ अष्टमीला केशराचे सरबत प्रसाद म्हणून दिले जात होते.
पार्ले टिळक विद्यालय हा पार्ल्याचा मानबिंदू होता,शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरे होत होते,शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी ह्या साठी भरपूर मेहनत घेत.आणि संमेलन नीटपणे पार पडलेकी शिक्षक मंडळींच्या चेहऱ्यावर समाधानाची पावती दिसत असे.,सर्वश्री पेंढारकर ,भाऊ भागवत,बाबुताई रोडे,ब.व.कुलकर्णी ,सहस्त्रबुद्धे ,ह्या शिक्षक मंडळीनी पार्ले घडवले ,पार्ले टिळक मध्ये शिकलेल्या एकाच विद्यार्थ्याचे नाव सांगितले तर तेव्हाशालेने काय आणि कोण घडवले ह्याची पुरेशी ओळख होईल ते नाव म्हणजे पु ल .पुलंच्या नवा पुढे स्वर्गीय हा शब्द लावायची हिम्मत मला होत नाही पु ल स्वर्गात वगैरे कुठेही गेले नाहीत ते अजूनही आमच्यातच आहेत.
पूल ना पर्ल्याने घडवले आणि त्यांनी पार्ल्याला अजरामर केले.
लोकमान्य सेवासंघ हे पुलांचे श्रद्धास्थान ,पुलांचे आजोबा ती.वामनराव दुभाषी हे पार्ल्यातल्या सारस्वत समाजाचे एक आदरणीय गृहस्थ होते ,प्रार्थना समाज रोड आणि अजमल रोड ह्या परिसरात दुभाषी,देशपांडे,भेंडे फडणीस हि सारस्वत मंडळी राहत होती.दर.नेवरेकर,वाघ ,पाखाडे धुरंधर,रानडे हि काही तत्कालीन पार्लेकर मंडळी.
अण्णा साठे हे समस्त पार्लेकारांचे लाडके व्यक्तिमत्व त्यांच्या "विजय स्टोर्स "ह्या दुकानात उत्तम माल मिळतो ,चोख व्यवहार उत्तम माल हे त्यांचे ब्रीद वाक्यच ,आणि ते अंमलातहि आणले जायचे.अण्णा पार्ल्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या नेहमीच अग्रभागी असत.अण्णाच्या मिठाला पार्लेकर कायमचे जागले.अण्णाचे पार्ले व पार्लेकारांवारचे वरचे प्रेम केवळ अतूट.
श्री.सुमंत जोशी हे एक तत्कालीन बहुश्रुत व्यक्तिमत्व.ते दैनिक नवशक्तीत उपसंपादक होते,टिळक मंदिर रोडच्या कोपऱ्यावर त्यांचा "यश्मुना"नावाचा बंगला होता,ग्यालरीत बसलेले सुमान्त्जी सायंप्रकाशात एखाद्या ऋषी सारखे भासत. पर्लेकारांचा पिंडच कलावंताचा होता ,लोकमान्य सेवासंघाने सोज्वळ आणि संपन्न अदाकारी पार्लेकाराना शिकवली ,अनेक गायक गायिकांना घडवले नावारूपास आणले,दत्ता जोगदंड,लालजी देसाई ,..जयवंत कुलकर्णी .....नीला भिडे सारख्या उदयोन्मुख कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच मारली.
छोटसे असे हे उपनगर काही वर्षापूर्वी फार टुमदार होते ,बहुतेक वस्त्यांना अमक्याची वाडी तमक्याची वाडी ह्या नावाने ओळखले जायचे,पार्ले स्टेशन वरचे मद्रास क्याफे हे माझ्या माहितीतले सर्वात जुने उपहारगृह .मागून आप्पा जोगळेकरांनी गणपतीच्या सुबक मुर्त्या आणि मोदक दोनीही पार्ल्याला पुरवले.
पार्ले बिस्कीट कंपनी हे पार्ल्याचे सुगंधी गुपित.सर्व जगभर प्रसिद्ध असलेली हि बिस्कीट कंपनी आपले अस्तित्व सुगंधाने पार्ल्याचे वातावरण सुगंधित करत होती..
पार्ल्याच्या फाटकाजवळ बहुसंख्य ख्रिस्ती लाल रंगाच्या बांधवांची वस्ती होती.बरचसे ख्रिस्ती वसईकर ख्रिस्ती होते ,छोट्या छोट्या वाड्यात ,बागायती करणे,
आणि पार्ले मार्केटात ते विकणे हा त्यांचे रोजचे काम असे पार्ल्यात मिळणारी ताजी पालेभाजी,भेंडे,दोडकी पडवळ सारख्या भाज्यांचा पुरवठा ह्या मंडळीने पार्ल्याला वर्षानुवर्षे केला.
सणासुदीला आंब्याचे पान,भाताच्या ओम्ब्या आणि गावठी झेंडू हाताने गुंफून बनवलेली तोरणे हि ह्या समाजाने समस्त पार्लेकरांना वर्षानुवर्षे पुरवली. लाल रंगाच्या चॊकदिच्य नउवारी साडी नेसलेल्या ख्रिस्ती भगिनी पार्ले मार्केटात बहुसंख्येने दिसायच्या.पाणथळ भागात बागायतीचे काम करणाऱ्या ह्या मंडळीना हत्ती रोगाची लागण झालेली दिसायची ,त्या पायांना जळवा लावणे हा एक खात्रीचा उपाय मानला जात होता.
बहुतक पार्लेकारांचा प्रवास सुमित्राबाई वाघ,अथवा टिळक प्रसूती गृहात सुरवात होऊन वाघाजी भाई ह्यांच्या हिंदू स्मशान भूमीत संपत असे.
पार्लेकर हा परवलीचा शब्द होता ,पर्ल्याबद्दल इतर मुंबई करांना नेहमीच कुतुहूल वाटत असे फक्त पार्ले कर ह्या नावाखाली अनेक प्रांतांचे समाजाचे लोक एकसंघ कसे होतात हे न सुटणारे कोडे होते.
पार्ल्याला एअर पोर्ट आला आणी इतर उपनगरांच्या मानाने पार्ल्यातल्या जमिनीचे भाव वाढत चालले ,ते हनुमानाच्या शेपटाप्रमाणे आजही वाढत आहेत ,पार्ल्यातल्या अनेक लोकांनी आपल्या जागा विकून दोम्बाविलीला स्थलांतर केले.पार्ल्यात डोंबिवली फास्टची सुरवात झाली.कित्येक वर्षे एकमेकांशी गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या मालक आणि भाडेकरून मध्ये भिंती उभ्या राहल्या ,उंच इमारतींचे जंगल उभे राहिले ,बराचश्या वाड्या नामशेष झाल्या आणी त्या बरोबर पार्लेकर हि हरवला,झाडांच्ची आणी माणुसकीची हिरवळ सुकली.उंच उंच इमारतींच्या ओझ्याखाली माझे जुने लाडके पार्ले कैलासवासी झाले .
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :शशांक रांगणेकर

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita