५/१३/२०१५

असं खूश कराल आपल्या `लेडी लव्ह`ला!आपल्या `लेडी लव्ह`ला खूश करण्यासाठी तुम्हीही अनेक प्रयत्न करून थकला असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...


एका शोधानुसार, महिल अशा पुरुषांना महत्त्व देतात ज्यांचा स्वभाव शांत असतो आणि ते छोट्या आणि कमीत कमी शब्दांमध्ये विनम्रतेनं आपलं म्हणणं दुसऱ्यांसमोर मांडतात. याउलट एकाकी किंवा गुमसूम बसून राहणाऱ्या पुरुषांकडे महिला दुर्लक्ष करतात.


कॅनडास्थित यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबियाच्या मॉली बबेल यांच्या म्हणण्यानुसार, छोट्या छोट्या शब्दांचा प्रयोग करणारे, कमी बोलणारे पुरुष महिलांच्या नजरेत जास्त आकर्षक ठरतात. कारण, यांमुळे त्यांच्यातलं पुरुषत्व ठळ्ळकपणे समोर येतं.


तसंच, समजा तुमचा आवाज हळूवार आणि गोड असेल तर समजा की तुम्ही अर्धी लढाई इथंच जिंकलीत. पुरुषांचा हळू आणि महिलांचा थोडा उच्च स्वर अधिक आकर्षक मानला गेलाय.


बबेल यांच्या म्हणण्यानुसार, आवाज हे एक असं हत्यार आहे ज्याचा उपयोग आपण आपली ओळख बनविण्यासाठी करतो. आपल्या आवाजातील खूप कमी गोष्टी अपरिवर्तनशील असतात. त्यामुळे आम्ही आमची प्राथमिकता व्यक्तीचा आकार आणि बनावट ठेवली. त्यांनी ३० जणांचा आवाज रेकॉर्ड केलं होतं. यानंतर त्यांनी सगळ्यांना एकमेकांच्या आकर्षणाला एक ते नऊ पर्यंत अंक देण्यास सांगितलं.


`एलओएस वन पत्रिका`मध्ये प्रकाशित केलेल्या या अध्ययनात बबेल म्हणतात, शोधात भाग घेणाऱ्या महिलांनी त्या पुरुषांना जास्त अंक दिले ज्यांच्या आवाजात अधिक मृदुता आणि शब्द छोटे वापरले होते.Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search