५/१३/२०१५

दोन थेंब तुझ्या अश्रूंचे...



ह्रदयास या किती बोचून गेल्या तुझ्या आठवणी
कळ लागते ह्रदयाला अन् डोळे गाळतात पाणी !

सहवासानेच तुझ्या गंधीत झाल्या ज्या फूलबागा
आज दवात न्हाल्या की, अश्रू ढाळते पाकळपापणी !

रमवू कशात मन,सारेच कसे भकास इथे ?
व्याकुळ मी चातक, भरीस कोकीळेची आर्त विराणी !

जगण्याला अर्थच कुठे उरलाय आता,सांग ना...
रातंदिस तुझ्या आठवणींनी,जीव लागला झुरणी !

तरून जाईन या विरहसागरातही अलगद
फक्त साथीला दे दोन थेंब तुझ्या अश्रूंचे पाठवूनी !


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :अनिल सा.राऊत
9890884228

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search