हल्ली कळत नाही,
काय झालय मला...!!
हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
तुला पाहील्या पासून,
हरवून बसलोय स्वतःला.....
हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
नेहमी समजावत राहतो,
माझ्या बाव-या मनाला.....
हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
नकळत तुझंच नाव,
ओठावर येतं क्षणा क्षणाला.....
हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
ह्रदयाच धडधडणं ही,
नाही सांगू शकत कुणाला.....
हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
सुख चैन हरवून बसलो,
दुःख गोड वाटतयं मला.....
हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
तुझीच ओढ तुझीच आस,
दुसरं काही सुचेना लिहायला.....
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous