भेटताच चिंब पावसात,
मन पाहून तुला थिजलं...
झेलत हलक्या सरी,
अन् अंग चिंब भिजलं...
पाहिलीस तू मला,
भिजताना तुझ्या संग...
मिटून अन् डोळे तुझे,
साठवलीस नवे रंग...
माझ्यात तू, ये सामवं,
जाण या प्रितीचा गंध....
स्पर्शूनी तू या उरी,
दरवळेल प्रेमाचा सुगंध...
चुंबता तु उरास या,
भासतो नवा तरंग...
ह्दयात पेटती आग अन्,
वाटे विझवावं तुझ्या संग...
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous