धपकन प्रेमात पडतांना, तिला प्रेमात पाडायचं
राहून गेलं,
धपकन प्रेमात पडतांना, तिला प्रेमात पाडायचं राहून
गेलं,
तोंड दुखेपर्यंत बडबडतांना, हवं ते सांगायचं राहून गेलं.
ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल ठेवून एक
मुस्काटात,
हा अशुभ विचार करता-करता हवं ते घडायचं राहून गेलं.
नुसताच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यात स्वतःला शोधतांना माझ्याविना तिचं
अडायचं राहून गेलं.
तिच्या ओढणीचा, खांद्याचा स्पर्श हवा-
हवासा वाटतसे नेहमी,
सांगीन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय काढायचं
राहून गेलं.
प्रत्येक भेटीनंतर ती जातांना घालमेल जीवाची असह्य
होई,
त्या दिवशीही ती निघाली अन तिला अडवायचं राहून
गेलं
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous