५/१५/२०१५

पेंटरपरवा,
आवर्जून गेलो
एका नामांकित पेंटरकडे...
म्हणालो,
``पहिले पुसून दुसरे लिहायचे आहे..´´
तो ही खुशीने `हो´ म्हणाला...
तो खुष...मी खुष ...
दोन चार ब्रश, रंगाचे डबे घेऊन तो तयार...
मी त्याला कामाची कल्पना दिली-
``त्या सटवीने या कपाळावर
जे लिहीलेय ते पुसायचे आहे
आणि
पुन्हा...
फक्त आणि फक्त
चांगलेच तेवढे लिहायचे आहे....!´´
तो चाट...
काही बोलला नाही...
स्वतःचे कपाळ पुसले,
ब्रशने दुकानाच्या फलकावर
पांढरा रंग गिरबाडला...
माझ्याकडे वळला,
``चला गुरु,आपल्या दोघांसाठीही
दुसरा पेंटर शोधू...!´´संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)


लेखक :अनिल सा.राऊत
9890884228

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search