पुन्हा पुन्हा मी भांग पाडतो
केस पांढरा तरी न लपतो
मनात अजुनी विशीतला मी
हा नालायक वय दाखवतो
प्रवासात शेजारी माझ्या
असते जेव्हा सुंदर तरुणी
डोळ्यावर गोगल लावून मी
चोरून बघतो नजर फिरवुनी
संवादाच्या सुरवातीला
तीही हसते मीही हसतो
मग ती म्हणते "अंकल"जेव्हा
सारा उत्साहच गळपटतो....
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो
किती जरी दिलफेक वागलो
जाणीव एकच मनात असते
गेले आता ते दिन गेले
फिरून त्याचे येणे नसते
पिकल्या केसाला औषध नसते
तरुण मनाला मी सावरतो
जरी उधळतो मनात वारू
लगाम घालूनी मी आवरतो ......
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous