मे महिन्याची सुट्टी काय असते ते मोठ झाल्यावर अनुभवता येत नसते 
लपाछपी , गोट्या , भवरे , लगोरी... अशे खेळ आता कोणी खेळत नसते ...
काय होते ते दिवस...
आंब्याच्या आधी कैरी झाडावरून पाडून खालेल्ली असते ,,,
पाडताना काकू बघतील हि भीती पण असते ....
गावी जाण्याची तयारी हि फुल जोश मध्ये असते ....
पेपर झाले हि ख़ुशी निकाला दिवसापर्यत तर शाबूत असते ..
खेळखेळताना वेळेच बंधन नसते ....
अभ्यास कर रे रेड्या अशी आईबाबांची तक्रार नसते ....
खेळताना होणारी भांडण हि महत्वाची गोष्ट असते .....
आई ला नाव सांगतो अस बोलून जर गेला .....
तर लपायचं कुठे यात पण एक मज्जा असते....
आता मोठ झाल्यावर कळते ...
मे महिन्याची सुट्टी काय असते ...
आता सगळे महिने सारखे फक्त आठवड्याची सुट्टी माहित असते ... ...
मे महिन्याची सुट्टी काय असते .......
ते मोठ झाल्यावर अनुभवता येत नसते .....!!!Blogger द्वारा समर्थित.