५/०१/२०१५

मायक्रोसॉफ्टने लॉन्च केला सर्वात स्वस्त फोनमायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांचा सर्वात स्वस्त लुमिया स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. लुमिया ४३० मार्च महिन्याच जगभरात लॉन्च करण्यात आला होता.

भारतीय बाजारात या फोनची किंमत ५२९९ रूपये असणार आहे. मायक्रोसॉफ्टने जानेवारीत अफोर्टेबल ४०० सिरिज लॉन्च केली होती. या सिरिजमधील लुमिया ४३० फोन लॉन्च करण्यात आला आहे. या फोनला मायक्रोसॉफ्टने सर्वात स्वस्त फोन असल्याची माहिती दिली आहे. हा फोन विंडोज १० सपोर्टेबल आहे.

फिचर्स-
- ड्युअल सिम, ८.१ ऑपरेटिंग सिस्टम
- विंडोज १० अपग्रेटेबल, ४ इंच डिस्प्ले
- प्रोसेसर १.२ GHz ड्युअल कोर प्रोसेसर २०० स्नॅपड्रॅगन
- १ जीबी रॅम, इंटरनल मेमरी ८ जीबी, १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता
- 30 जीबी फ्री वन ड्राइव क्लाउड स्टोरेज
- २ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, ०.३ फ्रंट क‌ॅमेरा
- या फोनमध्ये वर्ड, एक्सेल, पावर पॉईंट असणार आहे.
- तसेच आउटलूक, स्काईप, वनड्राईव्ह यांसारखे अॅप्सही असणार आहेत.


संदर्भ: Zee news
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search