महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला आहे. तर गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींचे वाटप ४ जून रोजी दुपारी ३ वाजता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता संकेतस्थळावरून निकालाची प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे, त्यांना मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विहित नमुन्यात शुल्कासह १५ जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल.
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रतही उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी येत्या २७ मे ते १५ जून या कालावधीत अर्ज करता येईल, असं मंडळातर्फे कळविण्यात आलं आहे.
इथं पाहता येणार निकाल -
- www.maharesult.nic.in
- www.maharashtraeducation.com
- www.hscresult.mkcl.org
- www.rediff.com/exams
संदर्भ: Zee news
लेखक :anonymous