pm चे मोड
कधी कव्हरेजच्या आत तर
कधी कव्हरेज बाहेर असतो
नको असलेल्या कॉलचाही
कधी-कधी आहेर असतो
कधी सायलेंट कधी व्हायब्रेट
कधी फ्लाइटचे जोड असतात
पर्सनल मोबाईलचे (pm)असे
वेग-वेगळे मोड असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३