५/०४/२०१५

'रायगडावरील पाण्याचे साठे'
रायगडावर अनेक पाण्याचे साठे आहेत . ते कोठे कोठे आहेत ते आज तुम्हाला सांगतो , म्हणजे पुढच्यावेळी जेव्हा कधी रायगडावर जाल तेव्हा ते जाणिवपुवर्क शोधण्याचा प्रयत्न करा .
रायगडावरील गंगासागर , हत्तीतलाव , कुशावर्त , कोळीँब तलाव अशी प्रसिध्द आणि लगेच दिसणारी ही तलावे आहेत . बाराटाकी ही सुध्दा प्रसिध्द पण त्याच बरोबर हनुमान टाके हे ही पटकन दिसणारे टाके ..
आता तुम्हाला ठाऊक नसलेली पाण्याची साठी दाखवतो .
मशीदमोर्चाच्या आधी कड्याच्या लगीलगीने डाव्या हाताने निघावेँ तो एक टाकेँ लागते . टाक्याची वाट कठीण आहे . सगळ्यांना जाण्याजोगी वाट नाही . डोँगरदऱ्‍या हिँडायची सवय असेल , त्यानेच टाके शोधीत निघावे . पुन्हा माघारी मशीदमोर्चाकडे वळावे . हा मार्ग नाणे दरवाजातून लागतो . येथून वर मशीद मोर्चा .
महाद्वारावरील टप्प्यात खडकात खणलेली दोन टाकी आहेत .
लोखंडी लाटे जवळील वस्तीसाठी , तसेच उत्तरेकडील शिबंदीसाठी हनुमान टाके , तसेच या वाटेने पुढे टकमकाकडे जाऊ लागले की , तळात खोदलेले एक टाके आढळते .
गडावरील हत्ती , घोडे इत्यादी जनावरांसाठी हत्ती तलावातील पाणी वापरले जात होते .
बालेकिल्ला डाव्या हातास ठेवून उजवीकडल्या घळीने हिरकणीच्या दिशेने जाऊ लागले की वाटेत खडकात खणलेले टाके आढळते .
हिरकणीच्या टेपाच्या वरील भागात पाणी अडवून सुरेख तलाव तयार केला आहे . या तलावाच्या उजवीकडे खालच्या लवणांत तीन चार टाकी आहेत .
सचिवांच्या वाड्याच्या खाली काळकाई पहाऱ्‍याजवळ एक दोन टाकी आहेत .
कुशावर्त तलावाच्या वरील अंगास एक जलमंदिर आहे .
बाजारपेठेच्या दोन्ही बाजवांस पाण्याची दोन उत्तम टाकी आहेत .
जगदिश्वराकडे जात असता बामणटाके उजव्या हातास आहे .
काशीबाईसाहेबांच्या समाधीच्या वरल्या अंगास एक टाके आहे .
बाराटाकी तर प्रसिध्दच आहे . कोळीँब तलावात वर्षभर पिण्यायोग्य पाणी असते .
भवानी टोकाच्या उत्तरेस काळा हौद तर भवानी टोकाकडील चिँचोळ्या पठाराच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे .
भवानी टोकाजवळ दोन टाक्या आहेत .
समाधीच्या दक्षिणेस दगडांची एक खाण आहे ती मध्ये पावसाळ्यात पाणी साठते .
बालेकिल्ल्यासाठी मुख्य पाणी गंगासागर शिवाय बालेकिल्ल्यात पाण्याची व्यवस्था असली पाहिजे .
एकूण हिशेब घेता रायगडावर पाण्याचे अदमासेँ ११ मोठे साठे आहेत तर जवळ जवळ ३० टाकी आहेत .
याशिवाय तुम्हाला आणखी माहिती असल्यास द्यावी .
जय शिवराय
जय सह्याद्री

.

संदर्भ: facebook share

लेखक :बळवंतराव दळवीWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search