५/१६/२०१५

चाळीशीनंतर फुलते स्त्रियांच्या सेक्सची बाग


उत्साही अन् आकर्षक फिलिप्पाला वयाच्या ४८व्या वर्षी आयुष्यातल्या बेस्ट सेक्सचा अनुभव येतोय. ' वयाच्या या टप्प्यावर मला हा आनंद मिळणार आहे , असं कुणी २८ व्या वर्षी सांगितलं असतं तर मला अजिबात विश्वास बसला नसता , असं ती सांगते. पण त्यात एक गोम आहे. ' मला सेक्सचा आनंद मिळतोय खरा. पण तो माझ्या नव-याकडून नाही. ' असंही ती प्रांजळपणे कबूल करते.


चाळीशीत बेडरूममध्ये आनंद घेणारी फिलिप्पा ही अमेरिकेतली एकमेव महिला नाहीए. हेल्थ प्लस या मॅगझिनने २००० महिलांच्या केलेल्या एका सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. चाळीशीनंतर महिलांना सेक्सची नव्याने जाणीव झालेली असते , असं या पाहणीत आढळलं आहे. चाळीशीत सेक्स लाइफचा खरा आनंद मिळत असल्याचे यातल्या ७७ टक्के महिलांनी सांगितलं. तर आयुष्यात कधी नव्हे तो आता सेक्स हा महत्वाचा घटक झाला असल्याचं यातल्या ८२ टक्के महिलांचं म्हणणं आहे.

अमेरिकेत चाळीशीतल्या महिलांमध्ये करण्यात आलेल्या इतर काही सर्व्हेमधूनही या बाबी प्रामुख्याने पुढे आल्या आहेत.


महिलांमध्ये वाढत्या वयानुसार सेक्सच्या आनंदातही वाढ होत असल्याचे या सर्व्हेमधून स्पष्ट झाले असल्याचे ' द न्यू जॉय ऑफ सेक्स ' या पुस्तकाच्या लेखिका सुझान क्विल्लिम यांचं म्हणणं आहे. महिलांच्या आयुष्याबद्दललपवण्यात आलेलं हे सर्वात मोठं गुपीत असल्याचं क्विल्लिम यांचं म्हणणे आहे. परंपरागत संस्कृतीत सेक्सचा संबंध मुसमुसणा-या तारुण्याशी जोडला जात असतो. मात्र सत्य काही वेगळंच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मेनोपॉजकडे सुरू झालेली वाटचाल , करडे केस आणि त्वचेवर सुरकुत्यांचं आक्रमण होत असतानाच्या काळात स्त्रिया सेक्सचा अधिक आनंद घेत असल्याचे या वास्तव पुढे आलं आहे.


यामागे कारणंही अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या वयात महिलांमधली असुरक्षिततेचा भावना कमी झाल्याचं आढळलं आहे. मुली तरुण असताना त्यांचे ड्रेसिंग , वागणे , वजन इत्यादी गोष्टींकडे जास्त लक्ष असतं. या गोष्टींबद्दल सततच्या चिंतेमुळे त्यांच्यातला आत्मविश्वास ढासळलेला असतो. परिणामी त्यावेळी सेक्सच्या आनंद उपभोगू शकत नाही. वयस्कर महिलांमध्ये याबाबतीत मात्र अधिक आत्मविश्वास आढळतो. शिवाय त्यांना हवं असलेलं सुख मिळवण्यासाठी काय करायचंय याची त्यांना माहिती असते.

येऊ घातलेलं मेनोपॉज हेही या गोष्टीला कारणीभूत असल्याचं या पाहणीत आढळून आलं आहे.


मेनोपॉज जवळ येत असताना स्त्रियांच्या शरिरातलं खास नर्चरिंग हार्मोन म्हणून ओळखलं जाणारं अॅस्ट्रोजन आणि ऑक्सिटोजिनचं प्रमाण कमी होत असतं. स्त्रियांच्या शरिरात नर्चरिंग हार्मोन कमी झाल्याने स्वत:कडे लक्ष देण्याचा कल वाढलेला असतो. वयात आल्यापासून मुलींनी स्वत:कडे दुर्लक्ष करत इतरांच्या गरजांचा जास्त विचार केलेला असतो. मुलांचं संगोपणात ही तर जणू स्त्रियांचीच जबाबदारी झालेली असते. त्यामुळे आत्तापर्यंतच्या आयुष्यात स्वत:च्या इच्छा आकांक्षांना दुय्यम स्थान दिल्याची भावना त्यांच्यात बळावते , असं या पाहणीता आढळलं आहे.


मुलं थोडी मोठी झाल्यावर चाळीशीनंतर महिलांना त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ उपलब्ध झालेला असतो. अशावेळी आपल्याकडे लक्ष देणारा , संध्याकाळी जेवायला घेऊन जाणारा , अंगावरचे दागिने , कपडे इत्यादींविषयी विचारपूस करणारा केअरिंग पुरुष हवा असतो.


अमेरिकेत या वयातल्या स्त्रियांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. महिलांना स्वत:च्या हक्कासंबंधी झालेली जाणीव याला कारणीभूत असल्याचं बोललं जातं. आतापर्यंत या महिलांना आपल्या पतीच्याअफेअर्स सहन केलेलं असतं. पण आता हक्काची जाणीव झाल्याने त्यांनी पाऊल टाकलेलं असतं , असं या पाहणीत आढळून आलं आहे.


संदर्भ: Maharashtra Times
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search