५/२१/२०१५

टोमॅटो कढईलागणारे साहित्य:

७ ते ८ टोमॅटो, चिमूटभर हिंग, ४ चमचे बेसन, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, १ चमचा साखर, अर्धा चमचा मेथी दाणे, मीठ चवीनुसार, ५ ते ६ कढीपत्त्याची पाने, १ चमचा ऑलिव्ह ऑईल, २ सुक्या लाल मिर्च्या (अर्ध्या करून घेणे), चिरलेली कोथिंबीर

कसे तयार कराल:

टोमॅटो धुऊन स्वच्छ करून कापून घ्या. एका स्वच्छ भांड्यात हॅण्ड ब्लेंण्डरने या कापलेल्या टोमॅटोची चांगली प्युरी करा. टोमॅटो प्युरीमध्ये बेसन, हळद, लाल तिखट, मिठ आणि साखर घालून ब्लेंण्डरने ढवळून चांगले एकत्र करा. दोन कप पाणी घालून पुन्हा ढवळून घ्या. डीप नॉन-स्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, मेथी, हिंग, जिरे, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरचीचे तुकडे घालून, खमंग वास येईपर्यंत २ ते ३ मिनिटे ढवळा. आधी तयार केलेले टोमॅटोचे मिश्रण यात घाला आणि व्यवस्थित एकत्र करून, चांगली ऊकळी येईपर्यंत सतत ढवळत राहा. मंद आचेवर कढईतील मिश्रण १० मिनिटांसाठी उकळू द्या. तयार झालेली 'टोमॅटो कढई' एका बाऊलमध्ये काढून, कोथिंबिरीने सजवा. भाताबरोबर गरमगरम 'टोमॅटो कढई' सर्व्ह करा!

संदर्भ: लोकसत्ता 
लेखक :अशिमा गोयल सिराज

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search