५/१४/२०१५

XOLO'चा नवा स्मार्टफोनस्मार्टफोन उत्पादक भारतीय कंपनी 'XOLO' लवकरच एक नवीन बजट स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनची किंमत ५५०० ते ५७०० रुपये एवढी असल्याचं बोललं जात आहे.

'XOLO प्राईम' या नावाने हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. या फोनमध्ये ४.५ इंच IPS डिस्प्ले असणार आहे, तर रिझोल्युशन ८५४x४८० आहे. फोनमध्ये १.३ GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि १ जीबी रॅम असणार आहे. यात ८ जीबी इंटरनल मेमरी असणार आहे.

या फोनमध्ये पाच मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणार आहे. १,८०० mAhची बॅटरी असणार असून, डुअर सिम असणार आहे. अॅन्ड्रॉईड लॉलीपॉपवर आधारीत हा फोन काळा, लाल, निळा आणि सोनेरी रंगामध्ये लॉन्च केला जाणार आहे

संदर्भ: Zee News
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search