सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने नवं अॅप 'लाईट' लॉन्च केलं आहे. फेसबुक लाईट नावाच्या या अॅपद्वारे अँड्रॉईड युझर्स स्लो मोबाईल नेटवर्कवर न थांबता फेसबुक वापरता येईल.
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने त्याच्या फेसबुक पोस्टवर याबाबतची माहिती दिली आहे. मार्कने फेसबुकवर लिहिलं आहे की, आम्ही फेसबुक लाईट नावाचं एक अॅप लॉन्च केलं आहे. या अॅपच्या मदतीने जगभरातील स्लो मोबाईल नेटवर्क आणि अँड्रॉईड फोन युझर्स अॅधिक जलदरित्या फेसबुकचा वापर करु शकतात.
या अॅपचं साईज 1 MB पेक्षा कमी अॅसून आणि ते काही सेकंदांमध्येच डाऊनलोड होतं, असंही मार्क झुकरबर्गने सांगितलं. कंपनीचा दावा आहे 'फेसबुक लाईट' फार फास्ट आहे, जे कमी इंटरनेट स्पीडवरही फेसबुकच्या स्पीडवर परिणाम करणार नाही, या अॅपच्या वापरामुळे इंटरनेटचा डाटाही कमी खर्च होतो.
फेसबुकच्या म्हणण्यानुसार जगभरात मोबाईलवरुन फेसबुक अॅक्सेस करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
सध्या फेसबुकचं नवं आशियामध्ये सुरु केलं आहे. येणाऱ्या काही आठवड्यात युरोपसह आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतही सुरु करण्यात येईल. हे अप्लिकेशन प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.
संदर्भ: ABP News
लेखक :anonymous