६/१९/२०१५

‘नरेंद्र मोदी अॅप’

सोशल मीडियात कायम ‘सुपरअॅक्टिव्ह’ राहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आणखी एका माध्यमातून लोकांशी जोडले जाणार आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या नावाचा अॅप लॉन्च केला आहे. या अॅपच्या माध्यमातून मोबाईल युजर्ससाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईमेल पाठवून वेगवेगळ्या सूचना देऊ शकतात.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ट्विटरवर ‘नरेंद्र मोदी मोबाईल अॅप’ लॉन्च केल्याची माहिती दिली. सध्या हा अॅप केवळ अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध केला गेला आहे. “नरेंद्र मोदी अॅप लॉन्च झाला आहे. मोबाईलद्वारे माझ्याशी कनेक्ट राहा”, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन मोबाईल युजर्सना आवाहन केले आहे. हा मोबाईल अॅप इनोव्हेटिव्ह असल्याचंही मोदींनी म्हटले आहे.

काय आहे मोदींच्या ‘नरेंद्र मोदी मोबाईल अॅप’मध्ये ?


या मोबाईल अॅपमध्ये पंतप्रधान मोदींचे कार्यक्रम, केंद्र सरकारच्या कामांची माहिती मिळणार आहे


पंतप्रधान नरेंद्र मोदी या मोबाईल अॅपच्या माध्यमातून थेट मोबाईल युजर्सशी संवाद साधतील


मोबाईल युजर्सच्या सूचनांना स्वत: पंतप्रधान मोदी ईमेल आणि मेसेज पाठवतील


पंतप्रधान मोदींच्या बहुचर्चित ‘मन की बात’चा संवादही या अॅपवर उपलब्ध करुन दिला जाणार आहे


या अॅपवर मोदींच्या ब्लॉगचा सेक्शनही दिला आहे.

संदर्भ: ABP News
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search