सोनी कंपनी 26 जूनला नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात आगामी स्मार्टफोन एक्सपिरीया Z3+ लॉन्च करणार आहे. हा फोन सोनी कंपनी Z4 नावाने याआधी लॉन्च केला आहे. मात्र आता जगभरात Z3+ या नावाने लॉन्च करत आहे.
हा स्मार्टफोनही इतर सोनीच्या इतर फोनप्रमाणे वॉटर रेसिस्टंग असणार आहे. 5.2 इंचाची ट्रिलिमिनस स्क्रीनचा डिस्प्ले आहे. त्यासोबत 1920x1080 पिक्सेल रिझॉल्युशनही आहे. सोनीने हा फोन लाईव्ह कलर एलईडी डिस्प्लेचा तयार केला असल्याने या स्मार्टफोनचा डिस्प्ले आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. याशिवाय 3 जीबी रॅमही दिला गेला आहे.
एक्सपिरीया Z3+ चा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. 32 जीबी इंटरनल मेमरीसह 128 जीबीपर्यंत एसडी कार्डद्वारे मेमरी वाढवण्याची सुविधा आहे. त्याशिवाय अँड्रॉईड 5.0 लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
20.7 मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा आणि 5.1 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये एक्समोर R आणि हा 25mm वाईड अँगलसोबत आहे. हा फोन 4K व्हिडिओ रेकॉर्ड करु शकता. या फोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.
संदर्भ: ABP News
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous