६/१९/२०१५

विक्डलीकचा स्मार्टफोन लॉन्चभारतीय स्मार्टफोन कंपनी विक्डलीकने मिड रेंजमधील एक स्मार्टपोन लॉन्च केला आहे. ‘वॅमी नोट 4’ असे या स्मार्टफोनचं नाव आहे. विक्डलीकचा हा स्मार्टफोन वॅमी सीरिजचा अपडेशन आहे.

कंपनीने हा स्मार्टफोन पांढरा आणि काळा अशा दोन रंगांमध्ये बाजारात आणला आहे. जर तुम्हाला आता विक्डलीकचा हा स्मार्टफोन खरेदी करायाचं असेल, तर विक्डलीकच्या वेबसाईटवर जाऊन प्रीबुकिंग करावी लागेल. नवनवे आणि अपडेटेड फीचर्स असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत आहे 14 हजार 990 रुपये. महत्त्वाचं म्हणजे ‘वॅमी नोट 4’ हा स्मार्टफोन 4G सपोर्टिव्ह आहे.‘वॅमी नोट 4’मधील फीचर्स:
5.5 इंचाचा 1080x1920 रिझॉल्युशन असणारी पूर्णपणे एचडी स्क्रीन या स्मार्टफोनच्या डिस्प्लेला आहे.
स्क्रीन प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन दिला गेला आहे.
वॅमी नोट 4 अँड्रॉईड 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिमला सपोर्ट करणारा आहे
64 बीटचे 1.7 GHz चा ऑक्टा-कोर प्रोसेसर
3 जीबीचा रॅम
16 जीबीची इंटरनल मेमरी, एसडी कार्डद्वारे ही 64 जीबी पर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा
13 मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
कनेक्टिव्हिटीमध्येही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 3G, 4G या दोन्ही नेटवर्कना सपोर्ट करण्याची सुविधा आहे.
वॅमी नोट 4 मध्ये 3250mAh एवढी बॅटरी क्षमता आहे. बॅटरीचं स्टँडबाय टाईम आणि टॉकटाईमबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती दिली गेली नाही.


संदर्भ:ABP news
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search