भारतीय इलेक्ट्रॉनिक कंपनी झोलोने बाजारात नवं लॅपटॉप आणलं आहे. झोलोचं हे नवं कोरं क्रोमबुक ग्राहकांना ई-कॉमर्स वेबसाईट स्नॅपडीलवरुन खरेदी करता येणार आहे. या क्रोमबुकची स्नॅपडीलवर 12 हजार 999 रुपये एवढी किंमत आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत गूगल इंडियाच्या एका कार्यक्रमात झोलो कंपनीने हा क्रोमबुक लॉन्च केला होता. आता ग्राहकांसाठी स्नॅपडीलवर उपलब्ध झाला आहे.

या क्रोमबुकमध्ये 100 GB चं गूगल ड्राईव्ह स्टोरेज आहे. याशिवाय गूगल अॅप आणि इतर फीचर्ससह असणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये असं एक फीचर आहे, ज्याद्वारे 9 युजर्स एकाचवेळी व्हिडिओ चॅटिंग करु शकतात. त्याचसोबत जीमेल आणि गूगल ड्राईव्ह ऑफलाईन वापरण्याची सुविधा आहे. स्नॅपडीलच्या वेबसाईटवर सध्या डिस्काऊंट ऑफरही दिली गेली आहे.

'झोलो'च्या क्रोमबुकचे फीचर्स :
झोलो क्रोमबुकचा डिस्प्ले 11.6 इंचाचा आहे.
डिस्प्लेला 1366x768 चं रिझॉल्युशन आणि 200 नीट ब्राईटनेस आहे
1.8GHz ARM Mali 760 GPU प्रोसेसर
2 जीबी रॅम
16 जीबीची इंटरनल मेमरी, मायक्रो एसडी कार्डद्वारे मेमरी वाढवण्याची सुविधा
720p HD सपोर्टिव्ह वेब कॅम
कनेक्टिव्हिटी- 2.0 पोर्ट, SD कार्ड रिडर, वाय-फाय, ब्लूटूथ
एकदा चार्ज केल्यावर किमान 10 तास बॅटरीची क्षमता
1.15 किलो वजन
झोलो क्रोमबुक गूगलच्या क्रोम ओएसवरही चालू शकेल


संदर्भ:ABP News
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita