नैसर्गिक पंचनामा,...!
कुणी कुणाला दोष दिले तर
कुणी जबाबदारीच झटकली
मात्र निकृष्ठ दर्जाच्या कामांची
गोष्ट सगळ्यांनाच खटकली
जोरदार पडल्या पावसाने
बहारदारच हंगामा झाला
अन् केल्या कामांचाही जणू
नैसर्गिकच पंचनामा झाला,..!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३