वाट वेगळी ही,वेगळा मी वाटसरु
काट्यांवरती आयुष्याची शेज करु !
सुख ओरबाडले दोहातांनी आता
चला पथिक हो ...पाय थोडे लाल करु !
बसुन सावलीत काय कळणार होरपळ?
ऊन्हाची थोडी अंगारशाल पांघरु !
बसतिल चटके,जाणवेल तेव्हा दारिद्र्य
कळदुःखाची पेरणी या ह्रदयात करु !
बांधावरती नकोच नुसत्या कोरडगप्पा
चला पथिक हो...रान विषमतेचे नांगरु !
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :अनिल सा.राऊत
9890884228