येत्या पावसात असह्य होईल
शेतकऱ्याला शेत पिकवायला
पाऊस यंदा लवकर येणार
परत एकदा फसवून जाणार
उणीव त्या फसलीची काय
यंदाही देवां कंठावरी येणार
शेतकरी मर मर मेहनत करत
शेतामंदी हिरवा मोती पिकवल
तरसन तोही उत्पन्नाला मोठ्या
पिकलंहि तरी काय भाव मिळल
पहिलंच त्याला मरणाची पाळी
कसी चालल या जीवनाची गाडी
फासावर जाताय त्याचे मैतर
घेणार बळीराजा कितीरे बळी
बळीराजा कररे काही चतुराई
शेतकऱ्याला मदत जगण्याला
येत्या पावसात असह्य होईल
शेतकऱ्याला शेत पिकवायला
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :शशिकांत शांडीले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०