६/२१/२०१५

पाऊस कधीचा पडतो..


घन गर्जत आले मेघ
पाण्याचे टपोरे थेंब
पाऊस कधीचा पडतो,
मन झाले ओलेचिंब = १ =

झाली धरणी शांत शांत 
मेघ आले बरसत 
पाऊस कधीचा पडतो 
कृषीवल झाला निवांत = २ =

रस्त्यावर झाले पाणी 
टळेल का आता पाणीबाणी?
पाऊस कधीचा पडतो 
आता नको हुलकावणी = ३ =

पावसाचे झाले आगमन
पुलकित झाले तन मन 
पाऊस कधीचा पडतो 
आनंद झाला मनोमन = ४ =

संदर्भ: Facebook share

लेखक :श्री प्रकाश साळवी

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search