नको देऊ रे ओढ पावसा
रोज घेतो तुझा कानोसा
दाटुनी येतो नभी मेघ सावळा
वाटे बरसशील तू ,थंड होतील उन्ह झळा
आसुसली वृक्षवल्ली ,नदी सागरे
तुझ्यावाचुनी क्लांत पक्षी पाखरे
कलियुगी मनुष्य ,प्राणीमात्र तहान
पावसा रे तू आमचे जीवन महान
बरस बरस तू मेघमल्हार जसा
सकल जीवा दे तू दिलासा
संदर्भ: Facebook Share
लेखक :सौ . अनिता फणसळकर